टिपू सुलतान, शृंगेरी मठ आणि मराठे
स्त्रोत: https://www.facebook.com/share/1DejgRatbW/
शृंगेरी वरील मराठ्यांचा हल्ला
ऐतिहासिक घटनांचा अभ्यास खूप साकल्याने करणे आवश्यक असते. वरवर अभ्यास केला तर वरवरचे निकाल हातात येतात. म्हणून पूर्ण घटना समजून घ्यायची. मी कधीही जे निष्कर्ष मांडतो ते अश्या अभ्यासातून आणि सर्वांगीण आकलनातून येतात मग ते वर वर प्रचलित गोष्टींच्या विरुद्ध जाणारे असेल तरी ते पूर्ण सत्य असते.
हे प्रकरण पूर्ण जाणून घ्यायचे असेल तर मैसूर साम्राज्याचा इतिहास ज्ञात असला पाहिजे. मैसूर साम्राज्य वाडीयार साम्राज्य. राजा दुर्बल होता, त्याने हैदर अली ला आधी सेनापती आणि मग पंतप्रधान पद दिले. त्याने आक्रमकपणे साम्राज्य वाढवायला सुरुवात केली. दोन उद्दिष्ट समुद्रापर्यंत सत्ता वाढवणे. बंदर पण ताब्यात घेणे जेणेकरून भविष्यात अरबी राष्ट्रांशी व्यापार होऊ शकतो. खरी धार्मिक कारणे त्याला आणि पुत्र टिपू सुलतान ला ज्ञात होती. मुलगा टिपू सुद्धा राज्याचा सर्वेसर्वा झाला पण ऑफिशियली वाडियार होते.
त्यामुळे काही तोंडदेखल्या गोष्टी होत होत्या. जसे की वाडियार घराणे नेहमीच शृंगेरी पिठाचा आशीर्वाद बाळगून होते. तो तसाच चालू ठेवण्यात टिपू यशस्वी झाला.
नन्तर टिपू ने मलबार काबीज केले आणि एका दिवसात ५०००० हिंदू कापून काढले, हजारो बलात्कार केले हे सगळे त्याने त्यातील बुतशिकन गाझी जागा झाल्याचे निदर्शक होते. त्याने वाडियार नामधारी राजे करून ठेवले होते. त्याच्या या स्पेसिफिक कृत्याला आचार्यांचा आशीर्वाद नव्हता. त्याने मलबार मोहिमेसाठी आशीर्वाद मागितला, तत्कालीन शंकराचार्यांनी दिला. ही धार्मिक परंपरा आहे आणि जिंकून त्याने तिथे हैदोस केला. पण वरवर पहाता मठाने टिपू सुलतान समर्थन / आशीर्वाद दिला असेच होते.
ब्रिटीश आणि टिपू यांचा संघर्ष वेगळ्या पातळीचा होता. टिपूला मलबार बंदरामध्ये विकसित करून व्यापाराचा विस्तार करणे हे अपेक्षित होते. या मुद्द्यावर टिपू आणि ब्रिटीश खटकले.
पेशवे किंवा मराठा फौज तोवर यात नाक खुपसत नव्हती कारण तांत्रिकदृष्ट्या राज्य वाडियार यांचे होते. ते हिंदू होते. त्यामुळे मराठ्यांना फरक पडत नव्हता. मलबार ला जे झाले त्यातून खूप गोष्टी मराठ्यांना स्पष्ट झाल्या.
१) वाडियार आता नामधारी राजा आहेत. २) टिपू कट्टर धर्मांध आहें आणि आता तो तिथे इस्लामी राजवट आणतो.
अर्थात त्याला आता एकतर शरण आणणे , किंवा नष्ट करणे हाच पर्याय होता मराठ्यांनी टिपूला मलबार मधील अत्याचारांच्या बद्दल क्षमा मागावी अन्यथा आम्ही तुझ्यावर हल्ला करू. टिपूने नकार दिला आणि त्यानंतर मराठा फौजा टिपूवर तुटून पडल्या.. मराठ्यांच्या समोर लढण्याचे सामर्थ्य नसलेला टिपू श्रीरंगपट्टण च्या जंगलात जाऊन लपला. ब्रिटीश फौजांनी सुद्धा संधी साधून मराठ्यांशी हातमिळवणी केली. टिपू ला शरण येण्याशिवाय पर्याय नव्हता.
त्याने मराठ्यांना संदेश पाठवला, तुम्ही आणि मी इथल्या मातीतील आहोत तुम्ही ब्रिटिशांना का मदत करत आहात ? मराठ्यांनी सांगितले मलबार मधील अत्याचारांच्या बद्दल क्षमा माग. भविष्यात धर्मांध वागणार नाही असे अभिवचन दे तुला सोडून देऊ. टिपूने नकार दिला...
मराठा आणि ब्रिटीश फौजांना फ्रेंच आणि निजाम सुद्धा मदतीला आले आणि सर्वांनी मिळून टिपूचा पाडाव केला. टिपूला शृंगेरी पिठाच्या शंकराचार्यांचा आशीर्वाद होता हे उघड सत्य होते. याची खुन्नस मराठा फौजांच्या डोक्यात होतीच.
त्यावेळी मराठ्यांच्या फौजांच्या बरोबर पेंढारी मंडळी सुद्धा लढत असत. यांना scavengers म्हणत असत. मुख्य युद्ध संपल्यावर लुटालूट करणाऱ्या टोळ्या...अशाच टोळ्यांनी शृंगेरीवर हल्ला चढवला. आणि शृंगेरी मठ लुटला. तिथल्या शंकराचार्यांनी संतापून उपोषण सुरु केले.
नाना फडणवीस यांनी त्यांना आम्ही नुकसान भरून देऊ सांगितले आणि खेद व्यक्त केला.. खेद बर का क्षमा नाही..
आदि शंकराचार्यांचा शिष्य, एकारांत चित्तपावन ब्राह्मण आणि श्री विद्या उपासक असलो तरीही मराठा फौजांनी जे केले त्याचे पूर्ण समर्थन आहे. शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांचे हे कर्तव्य होते की जर टिपू त्यांचे ऐकत होता तर त्याला त्याने धर्मांधतेचा त्याग करायला भाग पाडायचे. या उलट त्यांनी त्याला आशीर्वाद दिले त्यामुळे त्यांना शिक्षा मिळायलाच हवी होती आणि ती मिळाली...
धर्म आणि राष्ट्र यांच्याप्रती अव्यभिचारी निष्ठा असणे आवश्यक आहे. शृंगेरी मठाधिपती त्याला विसरले तर त्यांना त्याची शिक्षा मिळणारच.
तळटीप-
प्रभा मिद्दडी नावाच्या स्त्रीने याचा उल्लेख करणारा एक लेख लिहिला. कट कॉपी पेस्ट वाली मुग्धा कर्णिक या लेखाला आपल्या टाईम लाईन वर घेऊन आग ओकू लागली... त्या दोघींनी सुद्धा हा लेख व्यवस्थित वाचावा म्हणून कोणीतरी त्यांच्या पर्यंत पोचवा.
मलबार डायरीज नावाचा एक ग्रंथ आहे तो वाचा.. टिपू सुलतान ने मलबार मध्ये केलेले अत्याचार वाचून रक्त थिजून जाईल... टिपू सुलतान हा स्वतःला दक्षिण भारतातील गाझी आणि खलिफा घोषित होण्याच्या वेडाने झपाटलेला होता. तो अरब राष्ट्रांशी संधान साधून संपूर्ण हिंदुस्तान इस्लामी करण्याचे वेडे स्वप्न बाळगून होता त्यामुळे त्याचा समूळ विनाश आवश्यक होता. आणि तो मराठ्यांनी केला... यासाठी मराठा सैन्याला लाख वेळा अभिवादन आणि या मार्गात धर्मच्युत होणाऱ्या शंकराचार्यांना झळ बसली ते सुद्धा आवश्यकच .....