इस्लामी आक्रमण
एकूण १४०० वर्ष राज्य केलं. या पूर्ण काळात उप १००० लाख हिंदू मारले गेले.
इस ६३६ ठाणे महाराष्ट्र
येथे पहिला नौदल हल्ला केला. परंतु त्यांचा पराभव झाला.
इस ६५० आधीपासून नौसेना व भूदल आक्रमणे सुरू होती.
पहिले यशस्वी यवन आक्रमण (अरब) >७११ इस. मोहम्मद बिन कासिम भारतीय उपखंडावर हल्ला केला
सिंध (उत्तर पश्चिम (वायव्य)) प्रांतावर (आजचा पाकिस्तान) हल्ला
त्याने देबल येथे प्रथम हल्ला गेला. प्रचंड लूटपाट जाळपोळ केली ३ दिवस आग धगधगत होती. या सर्वांत पवित्र गायींची हत्या केली, स्त्रियांचा छळ केला , मंदिरांची नासधुस केली.
तेथे सिंधी ब्राह्मण राजा दाहीर / दाहिर राज्य करत होता.
अरोर (रोहरी) सिंध प्रांताची राजधानी येथे त्याला मारून त्याचे मुंडके अजाज युसुफ बसरा इराक येथे पाठवण्यात आले. त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्याची राणी व मुलाने युद्ध केले.
ब्राह्मणाबाद या युद्धप्रसंगी त्याच्या मुलाने ६ महिन्यापर्यंत युद्ध केले. शेवटी फंदफितुरीमुळे ब्राह्मणाबाद पडले. २६ हजार लोक मारले गेले.
अरोर (रोहरी) इथे दाहीरच्या राणीने कासिम बरोबर लढण्याचा प्रयत्न केला. पण तो सुद्धा असफल झाला. शेवटी राणीने व सर्व स्त्रियांनी मुस्लिम क्रूरता ज्ञात असल्यामुळे सती जाण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ६ हजार लोक मारले गेले.
कासिम इतर सरदारांनी दाहिरच्या दोन्ही मुलींना कैद करून मध्यपूर्वेत नेऊन त्यांचा अतोनात छळ केला.
मुलतान (मूलस्थान) सूर्य मंदिर सिंध प्रांत कासिमने हे मंदिर उद्ध्वस्त केले नाही. त्याने त्याचा वापर bargain करण्यासाठी केला. ज्यामुळे हिंदू राजांनी मुलतानवर हल्ला केला नाही.
या सर्व घटनाक्रमानंतर उर्वरित लोकांनी मेवाड चितोर (वायव्य भारत) ठिकाण येथे आश्रयास गेले.
चितोर मध्ये बाप्पा रावल
हा राज्य करत होता. स्थलांतरित लोकांनी बाप्पाला घटित सर्व प्रसंग सांगितला. त्याने या गोष्टीचा सूड घ्यायचा निश्चय केला.
पुढे पूर्ण तयारीनिशी एक दिवस **त्याने मुस्लिम व्याप्त सिंध प्रांतावर जोरदार हल्ला चढवला.**
या युद्धात नागभट१ व इतर भारतीय राजांनी त्याला खूप मदत केली. ** या युद्धामध्ये नागभट १ व त्याच्या फौजांनी अतुलनीय पराक्रम गाजवत अरब फौजांचा चुथडा केला. या प्रचंड युद्धाचा परिणाम असा होता की अरबांनी नागभटाला इस्लामचा प्रथम शत्रू म्हणून घोषित केले. या दोघांनी अरब फौजांना केवळ सिंधप्रांतातून पळवून न लावता त्यांना अरेबियापर्यंत मागे लोटले. या महा भयानक अनुभवामुळे पुढे तीन शतके एका सुद्धा अरबानी पवित्र भारतभूवर स्वारी करण्यास धैर्य दाखवले नाही.**
(इस ९७१ - इस १०३०) द्वितीय यवन आक्रमण**
गझनीचा महमूद (तुर्क) याने २५ वर्षात १७ वेळा भारतावर आक्रमण केले.
१००१ मध्ये पेशावर (पुरुषपुरा)
त्याने पहिले आक्रमण १००१ मध्ये पेशावर (पुरुषपुरा) येथे करण्याचा निर्णय घेतला.
त्याने **राजा जयपाल** वर रात्री हल्ला केला. प्रचंड युद्धानंतर यात जयपालचा पराभव झाला. **हजारो सैनिक जयपाल हे युद्ध कैदी झाले. पराभूत जयपालची त्याने तेथे साखळदंडांनी बांधून लज्जास्पद पद्धतीने मिरवणूक काढली.**
नंतर मेहमूदने क्रूर करारा अंतर्गत त्याला मुक्त केले. किंतु अत्यापमानीत झालेल्या जयपालने स्वाभिमानाने आत्महत्या केली.
मेहमूदची क्रूरकर्मे तशीच चालू राहिली.
पुढे त्याने आपला मोर्चा मथुरा, नागरकोट ठाणेसर या पुरातन नगरांकडे वळवला.
इस १००४ द्वितीय आक्रमण भाटिया नगर( लाहोरच्या वायव्येला) बाजी राय
त्याचा अभेद्य असा किल्ला होता.
सुरुवातीच्या दिवसात बाजी रायच्या सैन्याने अतुल पराक्रम दाखवला व यवनांचे आक्रमण परतवून लावले.
शेवटी थोडे दिवसांनी सततच्या प्रयत्नाने बाजीरायाचा किल्ला भेदण्यात यवन फौज्यांना यश आले.
किल्ला पडल्यावर बाजीराय छुपे युद्ध करण्यासाठी वनात पळाला. मेहमूद ने त्याची सेनागण वनात पाठवला. तेथे त्याने म्लेंच्छ सैन्याचा निकराचा सामना केला. परंतु पराभव जवळ आला आहे हे कळतात त्याने स्वतःचा खंजीर काढून आत्महत्या केली.
**सेनागणाने त्याचा शिरच्छेद करून सुलतानास बक्षीस म्हणून दिले.**
पराभूत भाटिया नगरात महमूद ने अनन्वित अत्याचार केले लूटपाट केली. नगरातील उर्वरित हिंदूंना इस्लाम मध्ये धर्म परिवर्तनास सक्तीची आज्ञा केली.
यवना सैन्यदल परत जाताना असंख्य सुवर्ण मालमत्ता घेऊन गेले.
इस १००८ लाहोर आनंदपाल ( जयपालचा मुलगा)
मेहमूद चा धोका लक्षात घेऊन आनंदपालने हिंदू
भूमीच्या रक्षणासाठी इतर राजांना मदतीचे आवाहन केले. त्यासाठी उज्जैन, कालिंजर, अजमेर, दिल्ली, कन्नौज येथील राजांनी मदतिचा हात दिला.
या सर्वांनी पंजाब कडे चाल करून पेशावर (पुरुषपुरा ) येथे संमेलित झाले.
४० दिवस दोन्ही सैन्यामध्ये तुंबळ युद्ध झाले. या सैन्याचे आवाका प्रचंड असल्याने सहाय्यासाठी अकंपित विश्वासपूर्ण स्त्रियांनी त्यांचे कुलालंकार, सोने व इतर मौल्यवान वस्तू विकून आर्थिक व मानसिक सहाय्य केले.
मेहमूदला कळून चुकले होते की हिंदू राजांची ही संधी ही सामान्य गोष्ट नसून यासाठी खूप परिश्रम व चातुर्य दाखवून यांना मात द्यावी लागेल. आनंदपाल व सहभागीराजांच्या जिंकत असताना अचानक नियतीचा फेरा फिरला.
आनंदपाल हत्तीवरून युद्ध करत होता. पण अचानक गोळीबाराच्या आवाजाने हत्ती चवाताळला. तो मागे जाऊ लागला. या सर्व प्रकारामुळे हिंदू सेना गोंधळली. यामुळे आपला पराभव होत आहे अशी वार्ता सैन्यात पसरली. त्यामुळे सैन्य सैरभैर होऊन मागे पळू लागले.
अब्दुल्ला ताई व आरसालन जाजीब यांनी पळणाऱ्या सैन्याचा पाठलाग केला. यात आठ हजार हिंदू नरसंहार झाला. गजनीच्या सैन्याला ३० हत्ती आणि इतर अनेक मालमत्ता मिळाली.
ठाणेसार
भव्य मूर्ती व अपार संपत्ती साठी प्रसिद्ध भीम राजा
भीम राजाने तेथे डोंगरावर किल्ला बांधला होता किल्ला मूर्तींचा खजिना असा ओळखला जाई.
पूर्ण भारतातून अनेक राजांनी धर्म सेवा म्हणून तेथे सुवर्ण, रजक व मोती पाठवले होते.
या चढाईत मेहमूदने असंख्य ब्राह्मणांची हत्या केली सात लाख सुवर्ण मोहरा , सहस्त्र परिमाण एवढे सुवर्ण रजकाची भांडी लुटून नेली.
एकूण त्याने महाविध्वंस घडवून आणला.
मथुरा कृष्ण जन्म स्थान उत्तर प्रदेश , सोमनाथ (भारताच शिरोमणी) गुजरात,
मेहमूदची क्रूरकर्मे येथेच संपत नाहीत. ठाणेसार नंतर त्याने आपला मोर्चा मथुरेकडे वळवला. त्या परिसरात असंख्य मंदिरे होती. त्याने ती सर्व मंदिरे जाळून टाकण्याची आजन्या केली. १०१७ वा १८ मध्ये त्याने महाबन (वृंदावन)चा विध्वंस केला. त्याने मथुरा कृष्ण जन्म स्थान मंदिराचा सुद्धा विध्वंस केला.
१०२६ सोमनाथ
त्याने शेकडो कारागिरांनी केलेल्या मंदिरातील सुंदर कलाकृती, मूर्ती एका तडाख्यात नष्ट करायला सुरुवात केली. तिथे उपस्थित लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली. ह्या हत्या कांडात साधारण ५० हजार लोक मारले गेले. ज्यांनी पळून जायचा प्रयत्न केला त्यांना शोधुन शोधुन मारले.
मेहमूदसाठी ही फक्त १ मोहिम नव्हती, परंतु या सनातन भूमी वर इस्लामधर्म स्थापन करण्याची त्याची मनीषा होती.
थोड्या फार वाचलेल्या ब्राह्मणांनी मेहमूदला मूर्ती रक्षणाच्या बदल्यात धन संपत्ती घेऊन जाण्याची प्रार्थना केली. तेव्हा त्याने उर्मटपणे त्यांना प्रत्युत्तर दिले कि मी स्वतःला मूर्ती भंजक म्हणून ओळखला जावो अशी इच्छा करतो, मूर्ती विक्रेता असा नाही. क्षणात त्याने मूर्तीचे दोन तुकडे केले.
भग्न मंदिरातून त्याने असंख्य मौल्यवान सामग्री, रत्ने संपत्ती लुटून नेली. सोमनाथच्या स्वारी व विध्वंसानंतर मध्यपूर्व विश्वात त्याला खुप बहुमान मिळाला.
मेहमूदचा बंदोबस्त ( परमार देव भोज )
मेहमूदचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी भारतातील बऱ्याच राजांनी परमार देव भोजच्या नेतृत्वाखाली मोर्चे बांधणी केली आणि मेहमूदच्या सोमनाथमधील जागेवर हल्ला केला. एवढा भीषण हल्ला बघून त्याने कच्छ - सिंध मार्गे गझनीला पळायला सुरुवात केली. तीन दिवस व रात्र पाण्याविना त्याच्या सकट सैन्याने घालवली. तिकडून भारतीय राजे त्याच्या पाठलाग करतच होते. शेवटी कसेबसे त्याने गझनी गाठले.
या सर्व प्रकारचा परिणाम असा झाला की त्याच्या पराक्रमी स्वारीचा अंत अत्यंत कटू व मानहानीकारक झाला. त्याला प्रचंड अपमान सहन करावा लागला. उर्वरित ४ वर्षाच्या आयुष्यात त्याने पुन्हा ह्या भूमीवर स्वारी करायचे धाडस केले नाही.
सोमनाथ गुजरात, पुनर्स्थापना
मेहमूदच्या अतिप्रचंड विध्वंसानंतर केवळ ५ वर्षात, मंदिर पुनर्निर्माणाचे शिव धनुष्य पेलले. त्यांनी केवळ पुनर्निर्माण केले नाही किंतु ते अजुनच भव्य निर्मिले. त्यांनी दाखवून दिले की भारतीयांची राखेतून उभे राहण्याची क्षमता जिद्द अरब मुस्लिम जिहादी संपवू शकत नाहीत!!
इस १५०० नंतरचा काळ
पोर्तुगीज पर्व
साभार: धोंडोपंत
भाग १: पोर्तुगीजांचे भारत आगमन..!
एके काळी भारत वैभवाच्या शिखरावर होता. जगभर भारताची 'सुवर्णभूमी' या नावाने प्रसिद्धी होती, भारतातून सोन्याचा धूर निघत होता. त्या धुराने इतरांचे डोळे दिपून जात होते.
हिंदुस्थानातजाऊन आलेल्यांनी सांगितलेल्या हकीगती चित्तवेधक असत. चंद्र- गुप्ताच्या दरबारी येऊन गेलेल्या एका ग्रीक प्रवाशाने लिहून ठेवले आहे :
"भारतातील लोक उत्तम शेतकरी आणि कुशल कारागीर असून ते फार मेहनती आहेत. येथील लोकांना व्यसने नाहीत. स्त्रिया पतिव्रता आहेत. येथे गुलामगिरीची पद्धत नाही. लोक पराक्रमी आहेत. त्यांना खोटे बोलणे आवडत नाही. येथे दाराला कुलूप लावण्याची आवश्यकत नाही..."
भाग २: गोव्यातील हिंदूचे बळजबरीने ख्रिस्तीकरण
सन १५४५ मध्ये हिंदू अपेक्षेप्रमाणे ख्रिस्ती धर्म स्वीकारत नाहीत त्यामुळे त्यांच्या बाबतीत कडक उपाययोजना आखण्याबाबत पाद्री मिगेल व्हाज त्याने पोर्तुगालचे राजे दों इयुआंव ३ रा याला जो अर्ज सादर केला तो असा-...
भाग ३: दिनांक ३० जून १५४१ आकाशातील एक आज्ञापत्र "आकाशातील देवाने हिंदूची सर्व मंदिरे उद्ध्वस्त...
दिनांक ३० जून १५४१ साली गोव्यात पोर्तुगीजांनी एक आज्ञापत्र काढले, "आकाशातील देवाने हिंदूची सर्व मंदिरे जमीनदोस्त करण्याची आम्हाला आज्ञा केली आहे."
आणि सुरु झाला.. हिंदुच्या मंदिरांचा विध्वंस..!
त्यास अनुसरून तीसवाडी, सासष्टी, बार्देज या तालुक्यातील मंदिरे पाडण्यात आली तर काही जाळण्यात आली..
मंदिराच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. पाडलेल्या हिंदुच्या मंदिरांच्या जागेवर मंदिरांच्याच सामानातून नवीन चर्च बांधण्यात आले. मंदिरांच्या जमिनी, कुळागरे सर्व चर्चच्या स्वाधीन करण्यात आले...