मराठे इतर माहिती
स्वराज्य अंत
स्त्रोत: युटू - Sushil Kulkarni | Analyser
१८१८ साली प्रताप सिंह राजे भोसले यांनी स्वराज्य इंग्रजांच्या हाती सोपवले.
फितूर लोक
स्त्रोत: युटू - The Marathi Bana
गणोजी शिरके आणि कान्होजी शिरके (येसुबाईंचा चुलत भाऊ) / शिर्के छत्रपती संभाजी महाराजांना पकडून द्यायला औरंगजेबाला मदत केली.
खेम सावंत (सावंतवाडी १६८३) औरंगजेबाचा मुख्य वजीर असलेल्या असद खानाने सावंतवाडीच्या खेम सावंताला ऑक्टोबर 1683 मध्ये चार हजाराची मनसबदारी देऊन बादशही सेवा करण्यासाठी हजर राहायला सांगितले.
राम दळवी, देसाई (कोकण)
चिमणाजी (खडकगड) हा जमीनदार बादशाही सेवेत रुजू झाला.
बजाजी निंबाळकर (शिवाजी महाराजांचे मेहुणे) व मुलगा महादजी निंबाळकर बजाजीच्या मृत्युनंतर ४ हजाराची मनसबदारी घेऊन मोगलांच्या सैन्यात कायम झाला.
शेख इब्राहीम (संभाजी महाराजांचा सेवक) हा १६८२ मध्ये १००० च्या मनसबदारीवर मोगलांना सामील झाला .
काजी हैदर (शिवाजी महाराजांचा मुंशी) हा २००० च्या मनसबदारीवर मोगलांना सामील झाला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांना दगा करून मोगलांना सामील झालेला आहे.
सटवाजी डफळे (सांगली जिल्ह्यातल्या डफळापूरचे पाटील) हे थोडा बहुत काळ वगळता नेहमीच मोगलांच्या किंवा विजापूरकरांच्या सेवेत राहिले हे डफळे पुढे जाऊन सांगली जिल्ह्यातल्या जतचे संस्थानिक झाले.
पदाजी एकोजी मल्हार व राव सुभानचंद्र , पुरुषा (संभाजी महाराजांचा नोकर) १६८४ साली गाजी उद्दीन बहादूर यांनी संभाजी महाराजांच्या सैन्यातील या दोघांना बादशाही सेवेत आणले. पुरुषा याने देखील मोगलांची नोकरी स्वीकारली.
भद्राजी, खंडोजी, रंबाजी, शंकराजी, निंबाजी, अंकाजी हे मोगलांच्या सेवेत आले. या लोकांची आडनावे मात्र उपलब्ध नाहीत.
अर्जुजी भोसले, किशनराव, भगवंतराव (१६८५) मोगलांना सामील झाले. काहींची देखील आडनाव उपलब्ध नाहीत. त्यांना शहा आलमक कडे मनसब देण्यात आली.
मलिक बेग, शेख हसन, अली राजा हे संभाजीराजांच्याकडे नोकरीला होते. पण अखेर ऑगस्ट १६८५ मध्ये हे लोक औरंगजेबाकडे गेले.
असोजी (संभाजी राजांचा साल्हेरचा किल्लेदार) तो गोवळकोंड्या ला जाऊन बादशहाला भेटला आणि त्याने औरंगजेबाची सेवा पत्करली.
पदाजी घाटगे (बुधे पाचगाव)
मानकोजी (सांगोल्याचा किल्लेदार) हा किल्ला मोगलांनी जिंकल्यानंतर तो २००० मनसबदारी स्वीकारून मोगलांना सामील झाला पुन्हा त्यानं सांगोल्याचीच किल्लेदारी घेतली.
बाजी सर्जेराव जेधे हे मोगलांना सामील झाले होते ते स्वराज्यात परत येण्यासाठी संभाजी महाराजांनी त्यांना खडसावणारे पत्रही लिहिले. अखेर १६८७ मध्ये ते स्वराज्यात परत आले.
घोरपडे (मुधोळ) पहिल्यापासूनच शिवाजी महाराजांच्या काळापासूनच स्वराज्याच्या विरोधात होतेच. औरंगजेब दक्षिणेत आल्यावर आणि विशेषतः विजापूरच्या राज्याचा बाजार झाल्यानंतर घोरपडे औरंगजेबाच्या सैन्यात सामील झाले.
नागोजी माने (मसवडची सरदेशमुखी) हे देखील एक मोठे सरदार होते त्यांनी थोडी बहुत मराठ्यांची सेवा केली असेल. पण ते औरंगजेबाला याच काळात सामील झाले.
पुढे याच नागोजी माने यांनी संताजी घोरपडे यांचा खून केला आणि मराठेशाहीला खूप मोठा धक्का दिला. संताजी घोरपडे यांचं शीर याच नागोजी मानेनं औरंगजेब बादशहाला नजर केलं.