महाभारत
हा इतिहास आहे. ह्यात १ लाख श्लोक आहेत.
कधी: ७ हजार वर्षांपूर्वी (सामान्य काळ पूर्व ५५६१ - महाभारत युद्ध)
स्रोत: नीलेश ओक
रचनाकार: महर्षी वेदव्यास यांनी या महाकाव्याची रचना केली.
व्यासांनी शिष्यांना शिकवले. त्या शिष्यांमधील एक म्हणजे वैशंपायन. त्यांनी सर्पसत्रात (अर्जुन > अभिमन्यु > परीक्षित > जन्मेजय ) जन्मेजयला महाभारत परत सांगितलं. त्याच सत्रात रोमहर्षण सौती असे विद्वान असतात. हे सत्र संपल्यावर रोमहर्षण सौती नंतर नैमिषारण्यात जातात. तेथे शौनक ऋषींचा यज्ञ चालू आहे. ते तेथे त्यांनी शिष्यांना सांगितले.
ह्यात १८ पर्व आहेत.
आदिपर्व
सभापर्व
अरयण्कपर्व
विराटपर्व
उद्योगपर्व
भीष्मपर्व
द्रोणपर्व
कर्णपर्व
शल्यपर्व
सौप्तिकपर्व
स्त्रीपर्व
शांतिपर्व
अनुशासनपर्व
अश्वमेधिापर्व
आश्रम्वासिकपर्व
मौसुलपर्व
महाप्रस्थानिकपर्व
स्वर्गारोहणपर्व
कालनिश्चिती
महाभारतात ३०० च्या वर खगोल शास्त्रीय नोंदी आहेत.
- अरुंधती वसिष्ठ
यातील एक महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे व्यासांनी लिहून ठेवले आहे की अरुंधती वसिष्ठांच्या (सप्तर्षी) पुढे चालत आहे.
सामान्य काळाच्या पूर्वी ४५०० ते १०००० वर्षापर्यंत ही परिस्थिती आकाशात होती.
- भीष्म निर्वाण
महाभारतात एका श्लोकामध्ये असा उल्लेख आहे की भीष्म दहाव्या दिवशी युद्धात पडल्यावर ५८ दिवस शरशय्येवर होते.
महाभारत युद्ध कार्तिक अमावस्येला सुरू झाले. भीष्म पितामह यांचा निर्वाण दिन (उत्तरायण चालू झाल्यावर) माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी या तिथीला असतो. याला भीष्माष्टमी असेही म्हणतात.
युद्धाच्या दहाव्या दिवशी पडल्यानंतर किमान ९५ दिवसांनी उत्तरायण येते.
यामुळे हे कळते की युद्ध सामान्यकाळ पूर्वी ५००० ते ७००० या काळातच घडू शकते.
- मंगळ
मंगळ ग्रहाची ८ वर्णने महाभारतात आहेत. ती सर्व फक्त सामान्य काळ पूर्व ५५६१ यावर्षीची आहेत.
महाभारत हा भारतीय संस्कृतीतील एक अद्वितीय धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक आणि दार्शनिक ग्रंथ आहे. याला जगातील सर्वात लांब साहित्यिक ग्रंथ आणि महाकाव्य मानले जाते आणि हिंदू धर्मात याला 'पंचम वेद' म्हणून ओळखले जाते.
📝 रचना आणि स्वरूप
- श्लोक संख्या: यात सुमारे १ लाख १० हजार श्लोक आहेत, ज्यामुळे ते आकाराने खूप मोठे आहे.
- विभागणी: संपूर्ण महाभारत १८ पर्वांमध्ये (अध्यायांमध्ये) विभागले गेले आहे. प्रत्येक पर्वात वेगवेगळ्या घटना आणि शिकवणींचा समावेश आहे.
- तत्त्वज्ञान: हे महाकाव्य धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांचे प्रतीक मानले जाते.
⚔️ मुख्य कथा (कौरव-पांडव संघर्ष) महाभारताची मुख्य कथा हस्तिनापूरच्या कुरु वंशातील दोन चुलत भावांच्या गटांमधील संघर्षावर आधारित आहे:
- कौरव: धृतराष्ट्राचे १०० पुत्र, ज्यात दुर्योधन प्रमुख होता.
- पांडव: पांडूचे ५ पुत्र—युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव. कथेचा संक्षिप्त सारांश:
- पार्श्वभूमी: कुरु वंशातील धृतराष्ट्र (अंध) आणि त्याचा धाकटा भाऊ पांडू यांचे पुत्र. पांडवांनी खांडववन जाळून इंद्रप्रस्थ नावाचे सुंदर नगर वसवले.
- द्यूतक्रीडा आणि वनवास: दुर्योधनाच्या आमंत्रणावरून हस्तिनापुरात झालेल्या द्यूतक्रीडेत (जुगारात) युधिष्ठिराने आपले सर्वस्व गमावले. परिणामी, पांडवांना १२ वर्षांचा वनवास आणि १ वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला.
- कुरुक्षेत्र युद्ध: वनवास संपल्यावर पांडवांनी आपले राज्य परत मागितले, पण दुर्योधनाने सुईच्या टोकावर मावेल इतकीही जमीन देण्यास नकार दिला. यामुळे कुरुक्षेत्रावर १८ दिवसांचे महायुद्ध झाले. पांडवांच्या बाजूने श्रीकृष्ण सारथी म्हणून होते.
- परिणाम: या युद्धात लाखो लोक मारले गेले. अखेरीस पांडवांचा विजय झाला आणि युधिष्ठिराचा हस्तिनापुराच्या सिंहासनावर राज्याभिषेक झाला. शेवटी पांडव आणि द्रौपदी हिमालयातून स्वर्गारोहणासाठी गेले.
🧘 भगवद्गीता महाभारतातील 'भगवद्गीता' हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे.
- कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवान श्रीकृष्णांनी महान धनुर्धर अर्जुनाला जीवनाचे आणि कर्माचे तत्त्वज्ञान शिकवले.
- यात कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग यांचे सखोल विवेचन केले आहे. हे आध्यात्मिक ज्ञानाचे सर्वोत्तम स्रोत मानले जाते.
🎭 प्रमुख पात्रे (उदाहरणादाखल)
| पात्र | भूमिका | वैशिष्ट्य |
|---|---|---|
| श्रीकृष्ण | विष्णूचा अवतार, अर्जुनाचा सारथी | तत्त्वज्ञानी, मार्गदर्शक आणि कुशल राजकारणी |
| युधिष्ठिर | पांडवांमध्ये ज्येष्ठ | धर्माचे आणि न्यायाचे प्रतीक |
| अर्जुन | पांडवांपैकी एक | महान धनुर्धर आणि भगवद्गीतेचा श्रोता |
| दुर्योधन | कौरवांमध्ये ज्येष्ठ | अहंकार आणि लोभाचे प्रतीक |
| भीष्म | कुरु वंशाचे आजोबा | महान योद्धा आणि प्रतिज्ञेचे (शपथेचे) प्रतीक |
| कर्ण | कुंतीचा पुत्र | दानशूर (दानवीर) आणि महान प्रतिस्पर्धी |
| द्रौपदी | पांडवांची पत्नी | साहसी आणि न्यायप्रिय स्त्री |
महाभारत हे केवळ एक ऐतिहासिक युद्धवर्णन नसून, ते धर्म, नीती, राजकारण, युद्धनीती आणि मानवी संबंधांचे सखोल दर्शन घडवणारे एक जीवनदर्शन आहे.
कर्ण
- खुनशी अत्यंत कद्रु मनाचा, स्वार्थी असाच आहे.
- कर्णाची गुरु भक्तीत सुद्धा स्वार्थ आहे. तो परशुरामाकडून सुद्धा अर्जुनाला पराभव करण्याकरता शिकतो.
- त्याचा दानशूरपणा रजोतम पद्धतीचा आहे.
- भीमाने धनुष्य युद्धात महाभारत युद्धाच्या वेळी कर्णाला १७ वेळा पराभूत केले. त्याचा रथ मोडून टाकला घोडे मोडून टाकले त्याला तो घाबरून पळत सुटतो व दुसऱ्या रथावर जातो आणि त्याला दूर घेऊन जातात. तो जेव्हा विश्रांती घेतो तेव्हा भीम लढतोच आहे परत कर्ण येतो त्याच्याशी लढायला लागतो परत त्याला भीम पराभूत करतो.
- बऱ्याचशा दुर्योधनाच्या ज्या वाईट गोष्टी आहेत भीमाला विष घालण्यापासून ते द्रौपदीच वस्त्रण करण्यापर्यंत, द्रौपदीला वेश्या म्हणणारा कर्ण आहे. आता तू बटीक झालेली आहेस आता तुझे पती कोणचा काही संबंध नाही तू कुणाजवळ राहू शकतेस इथे बस अस द्रौपदीला म्हणणारा कर्ण आहे.
- एकदा चित्ररथ गंधर्व जयद्रथला(??) बंदिवान करून घेऊन गेला. तेव्हा कौरव (कर्णाला) अपयश आले. पांडवांनी त्याला सोडवून आणले.
- गोग्रहण (गाई चोरणे ) त्या प्रसंगात कर्ण, भीष्म, द्रोण हे सर्व असून सुद्धा त्यांना अपयश आले. त्या वेळी अर्जुनानी त्यांचा पराभव केला.
- भीमानी, सात्यकीने कर्णला हरवलं आहे.
- भीमाला मारण्याचा प्रयत्न केला.
- लाक्षागृहात पांडवांना जाळण्याचा कट होता त्यात शकुनी बरोबर कर्ण देखील सामील होता.