पेशवे इतर
चिमाजी अप्पा
स्त्रोत: https://www.facebook.com/share/p/14TU7rQD6fb/
"जर तुमचे धर्मांतराचे प्रकार थांबले नाहीत तर मराठे थेट किल्यात घुसतील आणि तुमच्या घंटानादाचे ध्वनी आमच्या देवळात गुंजतील."
नरवीर चिमाजी आप्पा हे मराठेशाहीतील शूर, कर्तबगार व धोरणी सेनानी होते. कोकणातील श्रीवर्धनचे बाळाजी विश्वनाथ भट यांना थोरले बाजीराव पेशवे आणि धाकटे चिमाजी आप्पा असे दोन सुपुत्र होते. चिमाजी आप्पांचा जन्म इ.स. १७०६ च्या सुमारास झाला. थोरल्या भावाच्या सान्निध्यात राहून राजकारण, मुत्सद्देगिरी व युद्धकौशल्य यांचे ते धडे घेत होते. चिमाजी आप्पा शांत, संयमी, धोरणी आणि दरबारी कामात कुशल होते. बाजीरावांना पेशवाई मिळाल्यानंतर चिमाजी आप्पांना सरदारकी प्राप्त झाली आणि काही काळ त्यांनी अंबाजी त्रिंबक पुरंदरे यांच्यासह साताऱ्यात पेशव्यांचे वकील म्हणून काम पाहिले.
पहिल्या मोठ्या मोहिमेत १७२८ साली आमझरे येथील लढाईत माळव्याचा मोगल सुभेदार गिरिधर बहादूर व त्याचा नातेवाईक दया बहादूर यांना ठार करून त्यांनी संपूर्ण माळवा प्रांत मराठ्यांच्या ताब्यात आणला. या मोहिमेत चिमाजी आप्पांनी गिरिधर बहादूरचा स्वतःच्या तलवारीने शिरच्छेद केल्याची घटना त्यांच्या शौर्याचे ठळक प्रतीक मानली जाते. ज्या वेळी निजाम मोठी फौज घेऊन पुण्यावर चाल करून आला होता त्या वेळी थोरले बाजीराव कर्नाटक मोहिमेवर होते. नंतर पालखेडच्या ऐतिहासिक लढाईच्या काळात बाजीराव प्रत्यक्ष रणांगणावर व्यस्त असताना छत्रपती शाहू महाराजांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी चिमाजी आप्पांवर होती. पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शाहू महाराजांना सुरक्षित ठेवून चिमाजी आप्पा पाच हजार मराठी सेनेसह सज्ज होते. त्यामुळेच बाजीराव निर्धास्तपणे पालखेडच्या युद्धातील रणनीती आखू शकले.
१७२९ साली गुजरात प्रांतात चौथाई वसूल करण्यासाठी चिमाजी आप्पांनी स्वारी केली. त्यांच्या पराक्रमामुळे सरदार सरबुलंदखान याने शरणागती पत्करून मराठ्यांची चौथाई व सरदेशमुखी मान्य केली. १७३३ मध्ये त्यांनी सरदार शंकरबुवांच्या सहकार्याने बेलापूर किल्ला जिंकला. पुढे कोकणात मराठी राज्याला त्रास देणाऱ्या जंजिरेच्या सिद्धी सात याचा पराभव करून कोकणात मराठ्यांचा कायमचा वचक बसवण्यात आला. थोरले बाजीराव उत्तरेत व्यस्त असताना कोकणात वसई ठाणे भागात पोर्तुगीजांनी पुन्हा बळ मिळवून हिंदूंवर अत्याचार सुरू केले. कान्होजी आंग्र्यांच्या आरमारी वर्चस्वामुळे अस्वस्थ झालेल्या पोर्तुगीजांनी आंग्रे घराण्यात फूट पाडण्याचाही प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर चिमाजी आप्पांनी पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम उघडली. मार्च १७३७ मध्ये ठाणे जिंकून घोडबंदर, मनोर, अर्नाळा व पारसिक अशी अनेक ठाणी काबीज करत त्यांनी पोर्तुगीजांना जबरदस्त धक्का दिला.
१७३८ मध्ये चिमाजी आप्पांनी वसईवर निर्णायक मोहीम राबविली. खूप प्रयत्न करून सुद्धा किल्ला सर होत नाही हे बघून एक दिवस चिमाजी अप्पा चिडून आपल्या सैन्यापुढे आले आणि म्हणाले "तुम्हाला जर कोट जिंकता येत नसेल तर ठीक आहे. आता मला एका तोफेच्या समोर बांधून माझे मस्तक तरी कोटात जाऊन पडेल असे करा. मला त्यानेच समाधान वाटेल !" तब्बल चार महिन्यांच्या संघर्षानंतर किल्ल्याखाली सुरंग लावून खिंडार पाडण्यात आले, गनिमी काव्याने किल्ल्याची नाकेबंदी केली आणि १६ मे १७३९ रोजी मराठ्यांचा विजय निश्चित झाला. या मोहिमेत पोर्तुगीज सेनापती सिल्व्हेरा दि मेंझेस मारला गेला. पोर्तुगीज स्त्रियांना सन्मानाने गोव्याला पाठवले गेले आणि आंग्र्यांच्या आरमारामुळे समुद्रमार्गे येणारी रसद बंद करण्यात आली. वसई विजयानंतर मराठ्यांच्या ताब्यात ३४० गावे, २० किल्ले व २५ लाख रुपयांचा दारूगोळा आला आणि वरसोवापासून दमणपर्यंतचा प्रदेश स्वाधीन झाला. शरण आलेल्यांना चिमाजी आप्पांनी अभय दिले. वसई विजयाचे स्मारक म्हणून किल्ल्यातील घंटा महाराष्ट्रातील अनेक मंदिरात लावण्यात आल्या. वसई किल्ल्यातील चिमाजी अप्पांचा अश्वारूढ पुतळा आजही आप्पांच्या शौर्याची साक्ष देतो. वसई किल्याच्या विजयानंतर चिमाजी अप्पांनी किल्ल्यामध्ये हनुमंताची स्थापना केली. किल्याच्या परिसरात असलेल्या तेराव्या शतकातील नागेश्वर मंदिराचा परिसर नागेश महातीर्थ या नावाने प्रचलित होता. इ.स. १७४० मध्ये नरवीर चिमाजी अप्पांच्या अकाली मृत्यु नंतर श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला व श्री वज्रेश्वरीचे मंदिर बांधण्याचा अप्पांचा नवस पूर्ण केला.
" फिरंगी यांनी मर्दुमी शिपाईगिरी म्हणावी तशी केली. त्यांजप्रमाणे इकडील लोकांनी भारती युद्धाप्रमाणे युद्ध केले. यामागे युद्धे बहुत जाहाली. परंतु या युद्धास जोडाच नाही. श्रींचे सुदर्शन यांचे मस्तकी वज्रप्रहार होऊन टोपीकर म्लानत्व पावले. अन्यथा वसई सही न होती. फिरंगी आगीचा पुतळा होता. "
- चिमाजीअप्पांचे ब्राह्मेंद्रस्वामींना पत्र, १७३९
वसईच्या विजयानंतर लगेचच बाजीराव पेशव्यांच्या निधनाची वार्ता मिळताच चिमाजी आप्पा पुण्यास परतले. पुढे साताऱ्यात छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब यांना पेशवाईची वस्त्रे देण्यात आली. १७४० मध्ये चिमाजी आप्पांनी दीव दमण भागातील उरलेली पोर्तुगीज सत्ता पराभूत करून पोर्तुगीजांना केवळ गोव्यापुरते मर्यादित केले. अतोनात श्रम, सततची दगदग आणि क्षयरोगामुळे चिमाजी आप्पांची प्रकृती खालावली आणि १७ डिसेंबर १७४० रोजी त्यांचे निधन झाले. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात त्यांची समाधी आहे. त्यांच्या पत्नी अन्नपूर्णाबाई सती गेल्या. थोरले बंधू बाजीराव पेशव्यांच्या झगमगत्या कारकीर्दीत चिमाजी आप्पा सदैव सावलीसारखे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. "राम–लक्ष्मण" या उपमेप्रमाणे, बाजीरावांच्या नेतृत्वाला पूरक ठरणारे निष्ठावंत, कार्यक्षम व शूर सहकारी म्हणून चिमाजी आप्पांचे स्थान इतिहासात अढळ आहे.
धर्मधुरंधर, नरवीर चिमाजी आप्पांना विनम्र अभिवादन 🙏🚩
संदर्भ :-
पेशवाई, कौस्तुभ कस्तुरे The Era of Bajirao, Dr. Uday Kulkarni
#चिमाजी_आप्पा #वसई_मोहीम #मराठा_साम्राज्य
श्रीमंत माधवराव पेशवे
स्त्रोत: युटू श्रीमंत माधवराव पेशवा | being_historian भट पेशव्यांच्या घराण्यातले थोरल्या बाजीरावांचे चिरंजीव बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब आणि त्यांचे हे चिरंजीव म्हणजे थोरले माधवराव पेशवा.
माधवरावांच्या कारकीर्दीतील मुख्य सहा गोष्टी सांगता येतील :
१. हैदर अलीचा पराभव. प्रांतांची देवाण-घेवाण करून दक्षिण निर्वेध केली. २. उत्तरे-कडील बंडाळी मोडून पानिपतच्या पराभवाचा वचपा काढला. ३. निजामाला जरब बसवली. ४. घरातील व दरबारातील रुष्ट व असंतुष्ट आप्त व सरदारांना राज्याविरुद्ध वागू न देता त्यांना राज्यकार्यासाठी वळवून राज्यकारभारात सुधारणा केल्या. ५. खजिना व शस्त्रसज्जता कायम राखली. ६. राजकीय व सामाजिक व्यवहारांत वस्तुनिष्ठ धोरण ठेवले. अतिशय कार्यक्षम हेरखाते हे माधवरावांच्या कारभार-पद्धतीचे एक वैशिष्ट्य.
माधवराव गोरेपान, उंच, थोराड शरीराचे गृहस्थ होते. डोळे काळेभोर व पाणीदार होते. चेहरा उग्र होता. ते स्वभावाने मितभाषी असून रोखठोक व ठासून बोलत. लेखन निःसंदिग्ध, हुकूमतीचे पण रेखीव असे. तरुण वयात कोमल, गोरे, देखणे दिसत. कठोर परिश्रम, काळजी, निग्रहाने निस्तेज बनले. राहणी साधी व श्रमशील होतीं.
अनेकांचे सल्ले घेत तरी स्वतःच्या स्वतंत्र मताप्रमाणेच चालत. त्यांनी वडीलांचे पानिपतपूर्वीचे बहुतेक संकल्प सिद्धीस नेले. दिल्लीचा बादशाह, निजाम, हैदर, रजपूत राजे, शीख, जाट, इत्यादींचे व्यवहार स्वराज्याच्या दृष्टीने निर्गमात आणले. पूर्वीच्या ३ पिढ्यांत राहिलेली अपूर्णता व उघड चुका सुधारून राज्याचा गाडा अधिक सुरळीत केला.
कारण थोरले बाजीराव यांच्या निधनानंतर त्यांचे थोरले चिरंजीव म्हणजे बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब हे पेशवा झाले. आता नानासाहेबांचा थोरला मुलगाच नव्हता तो पानिपतच्या रणांगणावरती त्या लढाईमध्ये मारला गेलेला होता. पानिपतच्या युद्धानंतर पेशवेपदाची सूत्र कोणाकडे जाणार ह्या बद्दल गोंधळ निर्माण झाला होता.
अशा वेळेला नानासाहेबांचे जे धाकटे बंधू होते राघोबा दादा यांच्या भोवती लोक जमा व्हायला लागले. याचं साधं कारण असं की १७५८ सालच्या आसपास राघोबा दादा हे अटकला गेलेले होते. अटकेपार त्यांनी मराठ्यांचा भगवा झेंडा फडकवलेला होता अत्यंत पराक्रमी युद्धकुशल असे ते होते.
याच्यामध्ये एक लढाई झाली जी लढाई राघोबा दादा आणि माधवराव यांच्यामध्ये ती लढाई झाली. आता ही लढाई जेव्हा घडली त्यावेळी माधवराव अत्यंत आजारी होते त्यांना प्रचंड ताप आलेला होता ते लढू शकले नाही आणि त्यांनी सांगितलं की बुवा व्हा तुम्ही पेशवा. पुढे राज्याची वाटणी करा असा प्रसंग आला आणि माधवरावांनी एका झटक्यात आपल्या बुद्धीने तो निर्णय सोडवून टाकला तो प्रश्न सोडवून टाकला आणि त्यांनी सांगितलं की राज्याची वाटणी होणार नाही तुम्ही पेशवा व्हा मला काहीही त्या पदाचा मोह नाही राज्याची वाटणी करणारे आपण कुणीही नाही. यावेळेला माधवरावांचं वय हे १६ १७ वर्षाचं होतं. परंतु या इतक्या वयात इतकी समज त्यांनी दाखवली आणि हे कौतुकास्पद आहे.
निजामाचा पुणे हल्ला
पुढे निजामाने त्यांनी पुण्यावरती हल्ला केला त्यांनी पर्वतीवरच्या मंदिरांचा नाश केला आणि हे सगळं प्रकरण भयंकर टोकाचं झालं. ज्या वेळेला राघोबा दादा हा सगळा पेशवाईचा कारभार पाहत होते त्या वेळेला अनेक सरदारांना त्यांनी भयंकर मनस्ताप दिला आणि हे सगळे सरदार निजामाकडे गेले. निजामाचा जो दिवाण होता विठ्ठल सुंदर या विठ्ठल सुंदर या सगळ्या लोकांना आपल्या पक्षात करून घेतलं.
पुढे जेव्हा निजामाचा बिमोड करण्याचा प्रसंग आला त्यावेळेला आता करायचं काय हा प्रश्न उत्पन्न झाला त्यावेळेला सखाराम बापू बोकील जे होते. या सखाराम बापूंनी सगळी ती योजना आखली आणि त्याप्रमाणे ती पार पाडली. मल्हारराव होळकरांसारखा एक प्रचंड मोठा महापराक्रमी सेनापती मराठ्यांचे उत्तरेतले ते सुभेदार इतका मोठा माणूस त्यांनी त्याच्यामध्ये मध्यस्थीला घातला आणि ह्या सर्व सरदारांना नाराज झालेल्या परत बोलावलं माधवरांना पेशवाईचं सगळं आपले परत मिळालं.
१७६३ राक्षसभुवन लढाई
एक अत्यंत महत्त्वाची लढाई झाली आणि ही लढाई जी आहे ही पानिपतच्या लढाई इतकीच महत्त्वाची लढाई आहे कारण ही लढाई जर मराठे हरले असते तर मराठ्यांचं भविष्य पूर्णपणे अंधारात जाऊ शकलं असतं अशी ती महत्त्वाची लढाई ही लढाई म्हणजे राक्षस भवनाची लढाई ही राक्षसभूवनाची जी लढाई आहे हा इतिहासातला एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.
लढाईची पूर्ण योजना राघोबा दादा, माधवराव, सखाराम बापू या सगळ्या लोकांनी बसून ठरवली. आणि ती त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे बरहुकूम त्यांनी ती पार पाडली. यात सगळे उद्योग मागे बसून करणारा निजामाचा जो दिवाण होता विठ्ठल सुंदर आणि त्याचा मेहुणा म्हणजे कंधारचा राजा विनायक दास हे दोघेही त्या युद्धामध्ये मारले गेले राक्षस भूवनला पेशव्यांचा खूप मोठा विजय झाला.
याच्यामुळे एक गोष्ट काय घडली की लोकांच्या लक्षात आले की माधवराव जरी फक्त वयाने लहान असले तरी ते कर्तृत्वाने अधिकारांनी फार मोठे आहेत ते आपण त्यांना समजतो तितके ते छोटे काही अजिबात नाहीयेत हे सगळं झाल्यानंतर माधवरावांना त्यांचे सगळे अधिकार परत मिळाले. दुसरी महत्त्वाची घडलेली गोष्ट अशी की राघोबा दादांच्या मार्गदर्शनाखाली सगळा कारभार आपण करायचा वगैरे वगैरे हा जो काही प्रश्न होता हा आपसुकच निकालात निघाला आणि माधवरावांना स्वतंत्रपणे कारभार करता आला.
माधवरावांच जे काही नाव इतिहासामध्ये घेतलं जातं अत्यंत आदराने त्याचं एक प्रमुख कारण हे आहे की पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांचं मोडलेलं मनोधैर्य त्यांनी उभं केलं.
रघुनाथराव प्रथम (बाजीराव प्रथम यांचे पुत्र)
रघुनाथराव प्रथम नोव्हेंबर सन १७५० मध्ये उत्तरेकडे गेले होते. पुढें २० डिसेंबर, सन १७५२ ते जून सन १७५३ पर्यंत गुजराथमधील गोहदच्या स्वारीवर गेले होते.
उत्तर हिंदुस्थानातील पहिल्या स्वारीवर ३० ऑगस्ट, सन १७५३ ते ऑक्टोबर सन १७५५ च्या दरम्यान गेले होते.
जाटांविरुद्ध सन १७५४ च्या युद्धात त्यांनी कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा घातला. विजय दृष्टिपथात आला, तोच जाटांशी तह केला. उत्तरेकडील दुसऱ्या स्वारीत यांनी गाजवलेले शौर्य केवळ अतुलनीय होते. या स्वारीवर रघुनाथराव नोव्हेंबर, सन १७५६ ते ऑक्टोबर, सन १७५८ च्या दरम्यान गेले होते. याच स्वारीत जानेवारी सन १७५८ मध्ये कुंजपुरा जिंकले. लाहोर, अटक काबीज करून हिंदुस्थानची पश्चिम सरहद्द निर्वेध केली. अहमदशाह अब्दालीच्या फौजांना हिंदुस्थानाबाहेर पिटाळून दिल्ली काबीज केली. मथुरा, वृंदावन, गया, कुरुक्षेत्र, वगैरे पवित्र तीर्थक्षेत्रे मुसलमानांचे अमलातून सोडवली. मोगल बादशहा अहमदशाहाला कैदेत टाकून अझिझुद्दिनला ( दुसरा अलमगीर) बादशाह केले. सन १७५९-६० च्या निजामविरुद्धच्या उद्गीरच्या मोहिमेतही यांनी मोठा पराक्रम गाजवला होता. रघुनाथराव लढाईचे वेळी, त्यांना ब्रह्मद्रस्वामींनी दिलेले प्रासादिक सोन्याचे कमळ दंडावर 'निविघ्न' ' म्हणून बांधत असत.
अंगी मोठे शौर्य, धडाडी असूनही मुत्सद्देगिरी व चोख हिशोबीपणा यांच्या अभावामुळे रघुनाथरावांच्या बहुतेक मोहिमा आतबट्ट्याच्या होत. रघुनाथरावांच्या कार्यपद्धतीबद्दल सखारामबापू म्हणतात, 'रघुनाथरावाचा कारभार सुस्त, लटका व वोढा' याच मुद्यांवरून रघुनाथराव व सदाशिवरावभाऊ यांच्यात भर दरबारातही खटके उडत.