हिंदू व इतर धर्म

स्त्रोत: युटू youtube धर्मवीर - सर्वधर्मसमभाव

हिंदू निसर्ग पूजक

मुख्यत्वे जगामध्ये धर्म असं म्हणता येईल अशा खूप कमी संकल्पना उदयाला आलेल्या आहेत. सनातन वैदिक धर्म ही त्यापैकी सगळ्यात प्रबळ आणि आजवर अस्तित्वात राहिलेली संकल्पना आहे. बाकी जगभरातल्या जेवढ्या प्राचीन संस्कृती होत्या त्या सगळ्या संस्कृती सनातन धर्माप्रमाणेच निसर्गपूजक निसर्ग उपासक होत्या. परंतु या सगळ्या संस्कृतींना इस्लाम आणि ख्रिश्चनिटी या दोन विचारांनी संपूर्णपणे संपुष्टात आणलेल्या आहेत. त्यामुळे जगात आज प्राचीन संस्कृती आणि प्राचीन धर्म म्हणून जर एखादी संकल्पना अस्तित्वात असेल तर ती केवळ आणि केवळ सनातन वैदिक धर्म हीच संकल्पना आहे ज्याला आपण आज हिंदू धर्म असं समजतो.

अब्राहमिक धर्म

जगातला दुसरा एक प्रबळ आणि मोठा धर्म विचार म्हणजे अब्राहमिक धर्म. या अब्राहमिक धर्माचा पाया म्हणजे जे व्यक्ती अब्राहमाला पृथ्वीवरचा प्रथम पुरुष समजतात आणि जे लोक अब्राहमाला प्रमाण मानून आपलं जीवन व्यतीत करतात असे सगळे लोक अब्राहमिक धर्माचे अनुयायी आहेत आता हा अब्राहमिक धर्म त्याच्या मूळ स्वरूपामध्ये उरलेलाच नाहीये. आज त्याचे तीन संप्रदाय मात्र अस्तित्वात आहेत.

  • १. ज्यू
  • २. ख्रिश्चन
  • ३. इस्लाम

संप्रदाय इंग्रजीमध्ये शब्द रिलीजन सापडेल, हा धर्म नाही !!

१. ज्यू संप्रदाय

ज्यू जो विचार आहे ते मोजेसला प्रमाण मानतात मोजेस ने दिलेल्या दहा कमांडमेंट च्या वरती किंवा त्या अनुसार जु लोक आपलं जीवन व्यतीत करतात. ज्यू धर्मामध्ये तुम्ही जु म्हणून जन्माला येणे हीच सर्वात मोठी उपलब्धी मानले जाते. त्यामुळे कुठलाही व्यक्ती हा जन्माने ज्यू असू शकतो तो ज्यू हा विचार किंवा जु हा धर्म नंतर धारण करू शकत नाही. तो ज्यू या संप्रदायाचा भाग होऊ शकत नाही.

२. ख्रिश्चन

स्वतः येशू ख्रिस्त हा ज्यू होता पण मोजेस ने दिलेल्या धर्मविचारांमध्ये ईश्वराचे स्वरूप हे निष्ठूर न्यायाधीशाप्रमाणे होतं येशू ख्रिस्ताने ईश्वराला परम करुणामयी या स्वरूपामध्ये बघितलं त्यामुळे ख्रिश्चन धर्म विचार हा जू मधूनच निघालेला आहे परंतु तो अब्राहमिक धर्माची शाखा आहे.

साम दाम दंडभेद हे चारही मार्ग वापरत आपल्या संप्रदायातील लोकांची शिरगणती वाढवण्याचा प्रयत्न करतात. हा सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा धर्म आहे.

३. इस्लाम

अरबस्थानात जन्माला आलेला इस्लाम इस्लामचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी धर्माला एका वेगळ्या चश्म्यातून एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं त्याच्यातून जो विचार प्रसवला तो म्हणजे इस्लाम.

साम दाम दंडभेद हे चारही मार्ग वापरत आपल्या संप्रदायातील लोकांची शिरगणती वाढवण्याचा प्रयत्न करतात. हा दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे.

भारतीय संविधान व धर्म

आपलं संविधान लिहिताना आपल्या संविधानकर्त्यांनी एक फार मोठी सैद्धांतिक चूक केली.

त्यांनी इस्लाम आणि ख्रिश्चनिटी या संप्रदायांना धर्म समजण्याची चूक केली आणि त्यांनी या इस्लाम आणि ख्रिश्चनिटी संप्रदायांना हिंदू धर्माबरोबर एकाच तागडीत टाकलं आणि तिघांनाही समान अधिकार प्रदान केले.

मुळातून आपण हिंदू सर्व समावेशक आहोत. आपण म्हणतो एखादा व्यक्ती ईश्वराची त्याच्या एका विशिष्ट पद्धतीने उपासना करतोय तो ईश्वराच्या एखाद्या विशिष्ट स्वरूपाला पुजतो आहे तर ती त्याची वृत्ती आहे तो त्याचा अधिकार आहे त्याला आपण त्या पद्धतीने ते काम करू दिलं पाहिजे.

त्यामुळे हिंदू धर्म हा जगातल्या सर्व धर्म विचारांचे स्वागत करतो हिंदू धर्म जगातल्या सगळ्या संप्रदायांचे स्वागत करतो. परंतु ही वैचारिक परिपक्वता इस्लामकडे , ख्रिश्चनिटीकडे नाही.

त्यामुळे ख्रिश्चन आणि इस्लामी लोक येन केन प्रकारेण (कुठल्या ना कुठल्या मार्गाने) आपल्या संप्रदायाचा विस्तार करणं हेच आपल्या जीवनाची इतकर्तव्यता समजतात दुर्दैवाने त्यांच्या प्रमाण असणाऱ्या धर्मग्रंथांमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला आहे.

या विस्तारवादी भूमिकेमळे, स्वतःचं प्रभुत्व वाढवण्यासाठी म्हणून त्यांनी केलेला रक्तपात हाच या २००० वर्षांचा इतिहास आहे मग त्यांनी सर्व प्रकाराने तलवारीचा वापर करत जगभर आपले संप्रदाय वाढवले पोहोचवत नेले आज परिस्थिती अशी आहे.

यापुढे सर्व धर्म समान असतात या चुकीच्या सिद्धांतामधून बाहेर पडा.